प्रतिनिधी पुसद
पुसद : मोतीनगर परिसरातील विरंगुळा योग केंद्रात महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने रविवार, दि. 31 मे 2026 रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर योगाचार्य विलास पलीकोंडावार, प्रा. गोविंद फुके, भास्करराव व्यवहारे, रंजीता कन्नावार व अनुपमा नालमवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या आदर्श प्रशासन, समाजसेवा आणि लोककल्याणकारी कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रवीण मस्के यांनी केले. याप्रसंगी प्रकाश जयस्वाल, साई वट्टमवार, स्वरूपा चक्करवार, वर्षा भवानकर यांच्यासह मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते. प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
