पदवीधर निवडणुकीसाठी माहूरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा प्रचाराचा धडाका!
किनवट-माहूरमधील पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन
माहूर, प्रतिनिधी अंबादास मुकटे : छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी माहूर तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत किनवट व माहूर तालुक्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष मैदानात उतरावे, पदवीधर मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.माहूर येथे आगमन झाल्यानंतर किनवट व माहूर तालुक्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दौऱ्यामुळे स्थानिक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे युवा नेते डॉ. अब्दुल बाकी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश गावंडे पाटील, माहूर काँग्रेस तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माहूर पंचायत समितीचे माजी सभापती किशनदादा राठोड, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मंचकराव देशमुख, माहूर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, किनवटचे युवा नेते पुंडलिक आमले, अनिल पाटील जाधव, जगदीश पाटील तुपदाळे, माहूर शहराध्यक्ष शेख सादिक, तालुका कार्याध्यक्ष जयकुमार पाटील आडकीने, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोबिन शेख, सेवादल तालुकाध्यक्ष राजू राठोड, तालुका सरचिटणीस सैय्यद अली, निसार कुरेशी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बेहेरे, शहर सरचिटणीस शरीफ शेख, राजू सौंदलकर, संदीप सुकळकर, संजय गायकवाड, शेख जावेद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट आणि माहूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर महाविकास आघाडीने भर दिल्याचे या दौऱ्यातून दिसून आले.
