गेल्या तीन दिवसात गुढीपाडवा चैत्र नवरात्र रामनवमीनिमित्त हजारो भाविकांनी श्री रेणुका माता श्री दत्तप्रभूंचे घेतले दर्शन
प्रतिनिधी : अंबादास मुकटे माहूर
पवित्र सण गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्र महोत्सव ते येणाऱ्या रामनवमीनिमित्त माहूर गडावरील सर्व देवस्थाने भाविकांनी फुलले असून देवस्थान वरील प्रशासन विश्वस्त मंडळ भाविकांच्या सेवेत सज्ज असून आलेल्या हजारो भाविकांना गॅस तुटवडा असूनही चुलीवर ठोकळे जाळून महाप्रसाद तयार करून आनंदात पोटभर महाप्रसाद वाटप करत पिण्यासाठी फिल्टर चे पाणी देण्यात येत असल्याने येणारे हजारो भाविक मनोभावे आनंदात दर्शन होत असल्याने समाधान व्यक्त करताना दिसत आहेत
श्रीक्षेत्र माहूर गडावरील चैत्र नवरात्र महोत्सवात श्री रेणुका माता गडावर येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सुरक्षा व्यवस्था पिण्याचे पाणी दर्शन रांगेत पंखे कुलर तसेच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात सीसीटीव्हीच्या नजरेत भाविकांनी गेल्या तीन दिवसापासून आनंदात दर्शन घेतले तर विश्वस्त मंडळाकडून श्री रेणुका मातेची नित्य आरती महावस्त्र अलंकार अर्पण पूजा तसेच कलाकारांना मातेचे अभंग गाण्यासाठी सुसज्ज स्टेजची व्यवस्था असल्याने येणाऱ्या भाविकांना मातेचे सुरेल आवाजात अभंग गीत भजन ऐकावयास मिळत असल्याने भाविकांचे यावर्षीचे दर्शन आनंदात होत आहे
श्री रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे कोषाध्यक्ष तहसीलदार अभिजीत जगताप यांचे सह विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव विनायकराव फांदाडे बालाजी जगत दुर्गादास भोपी अरविंद देव आशिष जोशी यांचे सह सर्व पुजारी तसेच व्यवस्थापक विजय राऊत लेखापाल योगेश साबळे सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यासह सुरक्षारक्षक स्वयंसेवक तसेच अन्नदान प्रमुख अरुण घोडेकर आणि आकाश वानखेडे हे आलेल्या भाविकांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी तत्पर सेवा देत असून लिफ्ट आणि स्काय वॉक च्या कामामुळे थोडासा त्रास जाणवला तरीही भाविक मात्र भविष्यात लिफ्टने आरामात दर्शन घेता येईल या आनंदात पाचशे पायऱ्या चढ उतार करून आनंदात श्री रेणुका माता की जय असा जयकारा लावत दर्शन घेत आहेत गडावरील श्री दत्त शिखर संस्थान अनुसया माता संस्थान येथेही भाविकांनी उन्हाची तमान बाळगता आनंदात दर्शन घेत महाप्रसाद ग्रहण केले रामनवमी पर्यंत चालणाऱ्या चैत्र नवरात्र यात्रेत पोलीस तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

