माहूर शहरात विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्य व इतर प्रासंगीक आनंदोत्सवात मोठ्या व कर्णकर्कश आवाजात डीजे लावल्या जातात. सदरील डीजेच्या कर्णकर्कश व मोठ्या आवाजाने शहरातील बालके व हृदयविकाराचे आजार असणारे शहरातील नागरिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात डिजे लावण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे कडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी केली आहेडीजे च्या आवाजाने अनेक नागरिकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन मृत्यूशी झुंज देण्याची सुद्धा गंभीर वेळ येते. सुदैवाने आज पर्यंत अशी एखादी जीवितहानीची घटना घडली नसली तरीही भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडणारच नाही याची कुणीही शास्वती देऊ शकत नाही.
करिता पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभर ओळख असलेल्या माहूर या तीर्थक्षेत्रावर सर्व प्रकारच्या मिरवणुका पारंपारिक वाद्य, मंगल वाद्य लावून होणे आवश्यक असून डीजे या वाद्याला कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे.माहूर शहरात कोणत्याही महापुरुष जयंती मिरवणूक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये व डीजे मुक्त मिरवणुकीचे शहर घोषित करण्यात यावे अशी विनंती शिवसेनेचे तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे कडे केल्याने डीजे मुक्ती वर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर

