गजानन महाराज मंदिरातून पदयात्रेला प्रारंभ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अय्यप्पा स्वामींचे घेतले दर्शन
माहूर, प्रतिनिधी : हिंदू राष्ट्र निर्मितीच्या संकल्पनेतून श्री दिनेश महाराज कुलकर्णी, संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या किनवट ते माहूर पदयात्रेला यंदा सहावे वर्ष असून, या पदयात्रेच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा, हिंदू संस्कृती आणि आध्यात्मिक विचारांचा संदेश दिला जात आहे.
दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे किनवट येथील गजानन महाराज मंदिरातून या पदयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेऊन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
किनवट येथून सुरू झालेली ही पदयात्रा राजगड, वानोळा आणि दत्त मांजरी मार्गे श्रीक्षेत्र माहूर येथील दत्तशिखर येथे पोहोचून मुक्कामी असते. या धार्मिक पदयात्रेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र निर्मितीचा संकल्प, धार्मिक जागृती आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
श्री दिनेश महाराज कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही पदयात्रा सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आली असून, धार्मिक श्रद्धा आणि संकल्पाची परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम ठरत आहे.
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
