पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
लोकमाता न्यायप्रिय आणि जनकल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी समाजप्रबोधन महिला सक्षमीकरण लोककल्याण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे कार्यक्रम साजरे करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौकासह श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य न्यायव्यवस्था महिला सक्षमीकरण धर्मकार्यातील योगदान आणि लोककल्याणकारी विचार यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून उत्साहात जयंती साजरी केली
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे ॲड रमण जायभाये नीलकंठ मस्के डॉ निरंजन केशवे संजय भाऊ राठोड ज्ञानेश्वर लाड गोपू महामुने अविनाश भोयर सौ राधा उपलेचवार राजु सौंदलकर विलास गावंडे तानाजी मनभे अनिल वाघमारे विनोद सूर्यवंशी नंदकुमार जोशी सर इलियास बावाणी अविनाश भोयर योगेश परसवाळे पुरुषोत्तम लांडगे कैलास महल्ले संतोष महल्ले सौ स्वाती आडे रामकृष्ण केंद्रे कैलास फड पवन पांढरे नवल वानखेडे बळीराम डुरके संतोष गंधे संजय गुरनुले परमेश्वर कानडे आनंद हिंगाडे संतोष हिंगाडे बालाजी गेंटलवार लव गावंडे दत्तकृपा प्रतिष्ठानचे विजय कांबळे यांचे सह मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील मनीरामथड येथे पिंटू पाटील वायफनीकर यांचे सह मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली तर तालुक्यात सर्व ठिकाणी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
