पुसद ची मुलगी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : अखिल भारतीय स्तरावर आयोजित चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत वेदिका संतोष जाधव हिने ‘कला रत्न पुरस्कार २०२५’ पटकावला आहे. अखिल भारतीय नागरी विकास केंद्र यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
या स्पर्धेअंतर्गत चित्रकला, हस्ताक्षर आणि निबंध लेखन अशा विविध विभागांचा समावेश होता. वेदिका जाधव (इयत्ता नववी/जी) हिने आपल्या उत्कृष्ट कलाकृतीद्वारे परीक्षकांची मने जिंकत हा मानाचा पुरस्कार मिळवला.
सदर पुरस्काराचे गुणवत्ता प्रमाणपत्र ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आले. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असून शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
वेदिकाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही सर्जनशील क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
