विदर्भ न्यूज मराठी पुसद प्रतिनिधी : ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत पुसद येथे आज महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. रेस्टहाऊस येथे आयोजित या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. संजयजी कपूर (निरीक्षक), जिल्हा निरीक्षक मा. भय्याजी पवार, प्रदेश निरीक्षक मा. शकूरजी नागाणी, प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. मोहम्मद नदीम, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर, प्रदेश अल्पसंख्याक महासचिव सय्यद इस्तियाक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच तालुका अध्यक्ष विलास वाघमारे, शहराध्यक्ष झिया शेख, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा अल्पसंख्याक सचिव अब्दुल वाहब, कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव भगवान पंडागळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी संघटन बळकटीकरण, पक्ष विस्तार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यावर भर दिला. ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत प्रत्येक स्तरावरील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेणे, जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भक्कम संघटन उभारणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीस तालुका व शहरातील पदाधिकारी, युवक काँग्रेस कार्यकर्ते व इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
