बहुजन समाज बांधवांनी चित्रपट आवश्यक बघावा असे दिग्दर्शक यांचे आवाहन.
विदर्भ न्यूज मराठी पुसद तालुका प्रतिनिधी
आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 पासून *पेटला वनवा क्रांतीचा* हा सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचा क्रांतिकारी चित्रपट आपल्या पुसद नगरी येथील विजय टॉकीज येथे दुपारी बारा वाजल्या पासून चित्रपटाचा शुभारंभ होत आहे. हा चित्रपट बघून सर्व कलाकार यांना उपकृत करावे.
सविस्तर वृत्त असे की
बुध्द, कबीर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचा परिवर्तनवादी सामाजिक क्रांतिकारी चित्रपट
'पेटला वणवा क्रांतीचा'
विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ द्वारा निर्मित स्का फिल्मस् पस्तुत लेखक-दिग्दर्शक : मुकुंद जितोणे,निर्माता प्रविण तायडे इत्यादी सह
पेटला वणवा क्रांतीचा सामाजिक आशय असलेला चित्रपट या चित्रपटातील आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत महापुरूषांनी सुरू केलेली सामाजिक चळवळ त्यांचा त्याग व बलिदानाची जाणीव करून देण्यासाठी व्यसनाधीन होत चाललेल्या तरूण पिढीला व्यसन मुक्त करण्यासाठी प्रस्थापिकां कडून आजही विस्थापितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन समाजात समता, बंधुता, प्रेम, मैत्री निर्माण करण्यासाठी तमाम बहुजनांनी आपले आप्तेष्ट मित्र परिवारासह आपल्या नजीकच्या विजय टॉकीज पुसद या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट एकदा जरूर पहावा
असे आव्हाण गावागावत जाऊन या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक बहुजन समाजातील बांधव तसेच बौध्द उपासक, उपासिका सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी, अधिकारी, तथा व्यवसायिक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व सर्वांनी चित्रपट भात जाऊन आंबेडकर जयंती निमित्त हा चित्रपट जाऊन पहावा असे आवाहन मुकुंद जीतोंने यांनी केले आहे.
