माहूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही जगातील सर्वात मोठ्या जयंतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक भिम जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करण्यात येणार आहे.
यंदाच्या उत्सवासाठी समितीची कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून तुषार चौधरी व तुषार भवरे, सचिव म्हणून मनोज तामगाडगे व रितेश धुळे, सहसचिव म्हणून चंद्रकांत पाटील व आदित्य खंदारे यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी मानव शिंदे व मोहन बरडे, तर कार्याध्यक्ष म्हणून निहाल मोरे व विकास हाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीच्या सदस्यांमध्ये माधव कांबळे, तुळशीराम चवरे, दीपक गायकवाड, दत्ता कांबळे, नैतिक कांबळे, कार्तिक कांबळे, आदेश बरडे, अभिषेक खंदारे, आकाश शिंदे, अभिषेक खानजोडे, सुशील कांबळे, क्रिश तामगाडगे, संदीप गायकवाड, दत्ता गारगोडे, अरविंद खंदारे, प्रदीप बनसोडे, गजानन जोगदंडे, धम्मा वाकोडे आदींचा समावेश आहे.
१४ एप्रिल रोजी शहरातील शासकीय कर्मचारी, सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान चौक येथे पंचरंगी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सुरू असलेला अन्नदानाचा उपक्रम वार्ड क्रमांक १७, संविधान चौक परिसरात, शासकीय विश्रामगृहाजवळ पार पडणार आहे.
१६ एप्रिल रोजी संविधान चौक येथून भव्य रथ व मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीत नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. अशी माहिती आयोजक सिद्धार्थ तामगाडगे, दत्ता विठ्ठल कांबळे तसेच संयोजक विक्रांत भगत व आदेश लांडगे यांनी दिली आहे.
