माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथे ऑपरेशन फ्लॅश आउट मासरेड अंतर्गत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरुद्ध कारवायांनी वेग घेतला असून त्या अंतर्गत मौजे हिंगणी येथे हातभट्टी दारू काढण्याच्या तयारीत असलेल्याअड्ड्यावर धाड टाकून पाचशे लिटर रसायन जप्त करून नष्ट केल्याची घटना दि 28 रोजी सकाळी 8 .00 वाजता घडली आहे
माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथे मोठ्या प्रमाणात दारू काढण्यासाठी मोह फुलाचे व इतर रसायन साहित्य पैनगंगा नदीला लागून असलेल्या नाल्या शेजारी नदीच्या फ्लड एरियात जमा केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना प्रकाश गेडाम संदीप गोपनवाड पवन राऊत बालाजी राठोड शंकर रणमले यांचे सह पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून मोह फुलाचे रसायन साहित्य नष्ट केले यामध्ये सुमारे 30 हजार रुपयांचे रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले
पोलीस उपमा निरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आपण पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी तालुक्यात सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायाविरुद्ध धाडसत्र तसेच गुन्हे दाखल करण्याची मोहीम धडाक्यात सुरू केल्याने यात्रा काळात बाहेरगाव वरून येणाऱ्या गुन्हेगारांनीही काढता पाय घेतल्याचे दिसत आहे
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
