विदर्भ न्यूज मराठी पुसद तालुका प्रतिनिधी :--------
विद्युत वितरण कंपनीचे पुसद विभागा अंतर्गत कार्यक्षेत्रातील विद्युत ग्राहकांचे घरी विद्युत ग्राहकांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना तसेच त्यांची कोणत्याही प्रकारची सहमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आलेली आहे.या स्मार्ट मीटर मुळे विद्युत ग्राहकांना नाहक आर्थिक भूर्दड सहन करावा लागतो आहे.स्मार्ट मीटर हटवून नियमित सुस्थितीतील विद्युत मिटर बसवून विद्युत ग्राहकांना दिलासा द्यावा. अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलर मिटर व इतर विदयुत मिटर रिडींग दर महिन्यात घ्यावे अवरेज बिल देऊ नये व पुन्हा ऍव्हरेज बिल कमी करण्या करिता ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये.
पुसद विभागातील विद्युत वितरण कंपनीचे कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या 33 के.व्ही. उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा जास्त विद्युतभार पडत असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो.विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याकरिता योग्य ती उपाययोजना करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने कार्य करावे. 33 के.व्ही. उपकेंद्रामधून रोहित्रा पर्यंत विद्युत पोहोचण्याकरिता टाकण्यात आलेली विद्युत खांबे त्यांना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या विद्युत लाईन सभोवतालची वृक्षे साफ करून विद्युत पुरवठा सुरळीत राहावा अशी ही मागणी लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्युतरोहीत्रांची योग्य ती देखभाल करीत विद्युत रोहित्रे सुस्थितीत राहण्याबाबतही योग्य ती खबरदारी घ्यावी. असेही नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना शेती करिता लागणारी विद्युत योग्य आणि सुस्थितीत मिळण्याच्या दृष्टीने सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अखंडित व सुरळीत विद्युत पुरवठा देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विद्युत मोटर पंप चालू ठेवून आपल्या उत्पादनात वाढ करता येईल ज्यामुळे देशही समृद्ध होईल अशी निवेदनातून अशा व्यक्त करीत पुसद विद्युत विभागाअंतर्गत कित्येक विद्युत ग्राहकांनी सौरऊर्जेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आपल्या घरावर तसेच शेतीमध्ये सौरऊर्जेचा वापर सुरू केलेला आहे. अशा ग्राहकांना आपल्या विभागाचे माध्यमातून विद्युत देयके दिल्या जातात.ती देयके संबंधित कालावधीतच त्यांना देण्यात यावी. आवरेज बिल अवाजवी, अवाढव्य रकमेची विद्युत देयके देऊन विद्युत ग्राहकांना मानसिक त्रास देऊ नये. असेही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदनामध्ये नमूद करीत मागणी केली आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये सण, तेव्हार, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केल्या जाणार आहेत. या उत्सवामध्ये विद्युत पुरवठा अखंडित व सुरळीत राहण्याच्या दृष्टीने जातीने लक्ष देऊन गणेशोत्सव, महालक्ष्मी उत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सारख्या सण उत्सवामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये.याचीही दक्षता घ्यावी.
विद्युत ग्राहकांना सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टीने योग्य ती दखल घेतल्या न गेल्यास नाईलाजास्तव जन आंदोलन उभे करावे लागेल. असा इशाराही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लेखी निवेदनातून देण्यात आला आहे.
शिंदे शिवसेनेच्या वतीने संबंधित विभागाला लेखी निवेदन देताना शहर प्रमुख दीपक उकळकर,विधानसभा समन्वयक संजय सिंह बयास, शहर प्रमुख संतोष दरणे, महिला उपजिल्हाप्रमुख सुनिता भोयर, महिला विधानसभा संघटक नालीनी व्यवहारे, शहर संघटक अनिल चव्हाण,शहर समन्वयक अनिल तोंडारे,अल्पसंख्यांक आघाडी राजीक देशमुख,उपशहर प्रमुख अरुण जाधव,उपशहर प्रमुख बाबुराव पाईकराव, उपशहर प्रमुख भारत मोदीराज, प्रभाग प्रमुख रामराव सोनुने,प्रभाग क्रमांक कुणाल मडके, प्रभाग प्रमुख मिलिंद बांडे, प्रभाग प्रमुख सिद्धार्थ धुळे,प्रभाग प्रमुख तुषार व्यवहारे, प्रभाग प्रमुख सुभाष खुडे, शिवसेना सदस्य विजय ढोकणे,प्रशांत मंदाडे, टि एन दानातकर आदी उपस्थित होते.
