अमरावती विभागातून प्रथमच अमेरिकेचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान — विनोद जाधव यांची MDRT-2027 मध्ये निवड
विदर्भ न्यूज मराठी प्रतिनिधी पुसद
पुसद : अमरावती विभागासाठी अभिमानास्पद ठरणारी एक उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे. पुसद येथील श्री. विनोद जाधव यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित MDRT-2027 (Million Dollar Round Table) या सन्मानात स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. अमरावती विभागातून या उच्च दर्जाच्या सन्मानासाठी निवड होणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.
विमा व आर्थिक सल्लागार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, प्रामाणिक सेवा आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर श्री. जाधव यांनी ही उल्लेखनीय उंची गाठली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण असून, सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
तसेच, Corporate Club Member, COT (Court of the Table) आणि TOT (Top of the Table) या मानांकित दर्जांमध्येही त्यांनी स्थान मिळवले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित मानले जात आहे.
श्री. विनोद जाधव यांच्या या यशाबद्दल पुसद शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छुक :
सर्व अधिकारी व कर्मचारी, पुसद शाखा
