माहूरमध्ये भाजपचा जल्लोष: तीन राज्यांतील विजयाचा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव
विदर्भ न्यूज मराठी अंबादास मुकटे माहूर किनवट प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष माहूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बस स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून हा विजयोत्सव साजरा केला.
भाजपच्या या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. यादरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. फटाक्यांच्या आवाजाने आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर,राजेंद्र केशवे
अनिल वाघमारे ,नंदकुमार जोशी, नागोराव सुर्वे, ज्योतीराम राठोड, अपील बेलखोडे, अजय पवार, फिरोज खान पठाण, रहमत भाई, गौरव जैस्वाल, निलेश तायडे, अशोक जोशी ,योगेश परसवाळे यांचे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या विजयामुळे माहूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळातील वाटचालीसंदर्भातही पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा दिसून आली.
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
