*हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल पुसद उत्कृष्ट निकालाची परंपरा 23 वर्षाची कायम
*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा परिषद पुणे* मार्फत, सन 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वीच्या परीक्षेत पुसद येथील *हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल* निकालाची परंपरा कायम ठेवत यवतमाळ जिल्यातील एक नामांकित शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
शाळेमधून एकूण *190* विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून *60* विद्यार्थिनी विशेष प्राविण्य गुण प्राप्त केले आहे , *74* विध्यार्थी प्रथम श्रेणी तसेच *47* द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. इफरा तहेरीम गुलाम नबी शेख 94.00%, कु.मारिया ऐमन अन्सार अहमद 93.40%, कु.अफिरा फातेमा लाईक अहमद 93.00%,खुतेजा अहेवार वाहिद मिर्झा 93.00%,आसमीर खान सलीम खान 91.00%,कु.उम्मे हबीबाह अब्दुल हमीद 91.00%,फातेमा तबसूम जमील शाह 90.20%,फौझान अली इम्रान अली 89.40%,कु.मर्जूका मुदस्सीर शेख 89.00%,कु. जुबिया नाज सय्यद इर्शाद 88.20%,हस्सान ताहमी रहमतुल्ला खान 88.00%,कु.सना फिरदोस एजाज खान 87.40%,कु. सनाया सदीम नासिर अहमद 87.40%, कु.फरिसा खानम मो. शम्स नवेद 86.40%, कु.नौशीन खानम नसरुल्लाह खान 86.00%, मारिया जावेद मोहम्मद 86.00%गुण प्राप्त करून पुसद तालुक्यात शाळेचे नाव उज्वल केले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे *संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक* ( *मो. वकील सर* माध्य व उच्च माध्य विद्यालय, *याह्या खान सर* प्राथ.व उच्च प्राथ शाळा) *वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर , फहिमोद्दीन सर मो. जुनेद सर व सर्व शिक्षकवृंदानी* केले.
▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️
