गुलामीचे प्रतीक मानली जाणारी वाद्य,
आता आमच्या संघर्षाचा आवाज !
जागर समतेचा (मुंबई) जलसाचे अद्वितीय सादरीकरण
*बातमी पुसद*
धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित धमक्रांती प्रज्ञापर्व मंचावर जागर समतेचा आयोजित.
""कधीकाळी हीच वाद्य गुलामीचे प्रत्येक मानले जायची परंतु आता हीच वाद्य आमच्या संघर्षाचा आवाज बनली आहे ,"स्वातंत्र्याचा श्वास देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जागर समतेचा यांनी मानवंदना दिली.
*संत तुकोबाराय शब्दास अतिशय महत्त्व देतात.*
"*शब्दच आमच्या जीवाचे जीवन, शब्दच जनलोका वाहू धन, शब्दाचे गौरव पूजा करून*" संत तुकोबारायाची महती विशद केली...
"स्त्री पुरुषे सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा पोसावे आनंदाने || नित्य मुली-मुलां शाळेत घालावे अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास ||" महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातील काव्य....
*पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला.!*
*स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला.!*
*दुसरी माझी ओवी गायली तिच्या ग धैर्याला.!*
*दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा..!*
*ज्ञानज्योत लावीन तुला ग नमन,बंधुता जागवीन संघटित करीन...!*
अशा प्रकारच्या सावित्रीच्या ओव्या, संत तुकाराम चे अभंग, महात्मा फुले यांचे विचार, शाहीर वामनदादा कर्डक यांचे परिवर्तनशील गीताचे सादरीकरण करून प्रबोधनाच्या विचाराचा समतेचा जागर कलेतून सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पाराव मैंद, प्रमुख उपस्थिती महेश हंबर्डे , ऍड, बाळासाहेब वाठोरे एड, वाय एम.जांभुळकर, मिलिंद हटेकर,डॉ अतुल रुणवाल,
डॉ. रवींद्र वडते, डॉ रामचंद्र राठोड,निखिल गादेवार,
सुखदेवराव भगत,भीमराव उंदरे, नरेंद्र पाटील (पत्रकार) राजेश ढोले इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच धम्मक्रांती प्रज्ञापर्व अध्यक्ष प्रा.सुनील खाडे यांच्या सह विचार पीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळ व पारमिता महिला मंडळ केली. सामूहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्दन गजभिये यांनी केले आभार प्रदर्शन देवेंद्र खडसे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुसद तालुक्यातील बहुसंख्य धम्म बांधव महिला, युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
