विदर्भ न्यूज मराठी पुसद प्रतिनिधी
पुसद: प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधनपर्व 2026 यांच्यावतीने आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती समितीचे कार्यालय वसंतराव नाईक चौक येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली आहे.
सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला म.ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशांत गवळी व प्रबोधनपर्व समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जय जयकाराच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानून त्यांच्या कार्याचा वसा घेत आपले कार्य सुरू केले. असे त्यांच्या गुरु व शिष्यांच्या कार्याचा व आठवणीचा उजाळा यावेळी उपस्थित मान्यवर यांनी आपले मत व्यक्त करतांना उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराव्या शतकात व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणिसाव्या शतकात या दोन्ही महामानवांनी समाजासाठी आपले आयुष्य खर्च करून समता,स्वातंत्र्य व बंधुता मिळून देण्यासाठी व्यवस्थेशी लढत अस्पृश्य समाजासाठी काम करत त्यांचे हक्क प्रदान करून दिले तसेच स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला असे भारताचे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी या देशात परिवर्तन घडवून आणले व स्त्रीसह अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार मिळाला असे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतक जयंतीमध्ये पदार्पण होत आहे असे प्रबोधनपर्व समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी विठ्ठल खडसे सर शिक्षण सभापती न.प.पुसद, प्रा.कल्याण साखरकर, ॲड.वाय एम. जांभुळकर, डि.एस.अगमे सर, राजेंद्र नाईक, दिपक भवरे, संतोष आंभोरे, अंबादास वानखेडे,नगर सेवक रुषीकेश पंडीतकर, दीपक धानोरकर, व्हडगिर सर, महात्मा फुले जयंतीचे अध्यक्ष सुशांत गवळी, पत्रकार मारोती भस्मे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे पाईकराव, महेश निखाते, नितेश खंदारे, भास्कर बनसोड,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सेवानिवृत्त अधिकारी कांबळे साहेब, विजय निखाते, ओंकार सोनटक्के,ओम गवळी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
