विदर्भ न्यूज मराठी प्रतिनिधी पुसद ता प्र :- सप्तगिरी नगर मध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त 9 ते 15 एप्रिल यादरम्यान अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामूहिक गुरुचरित्र पारायणामध्ये 164 सेवेकरी सहभागी झाले असून या सप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप, अखंड विना वादन व गणेश याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग,मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, पसायदान आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये महिला व पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताहानिमित्ते बुधवारी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
यशस्वितेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सदस्यांनी पुढाकार घेतला.
