पुसद प्रतिनिधी :
नगरपरिषद पुसदचे पाणीपुरवठा सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ प गट) चे नेते श्री राजेश मल्हारी साळुंखे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे सर्वसामान्यांना न्याय, समता आणि बंधुता देणारे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून प्रत्येकाने त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की, शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळेच आज सर्वांना समान हक्क आणि संधी प्राप्त झाल्या आहेत.
शेवटी त्यांनी पुसद शहरातील सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत, सामाजिक ऐक्य व बंधुता जपण्याचे आवाहन केले.
