विदर्भ न्यूज मराठी पुसद (प्रतिनिधी) : आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत पुसद शहर व वसंतनगर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या आदेशानुसार हा रूट मार्च पार पडला. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री. हर्षवर्धन बी. जे. सहा, पोलीस निरीक्षक श्री. सेवानंद वानखडे (पो. स्टे. पुसद शहर) व पोलीस निरीक्षक श्री. झांबरे (पो. स्टे. वसंतनगर) व ट्रॅफिक पोलीस निरीशक श्री.चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
रूट मार्च तहसील चौक, महात्मा गांधी चौक, आंबेडकर वार्ड, बालाजी वार्ड, गुजरी चौक, देवकृपा चौक, नगीना चौक, कापड लाईन, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी विद्यालय, वसंतनगर पहिली गल्ली, दुर्गा माता चौक, बस स्टँड चौक, वसंतराव नाईक चौक, मुखरे चौक ते पोलीस स्टेशन पुसद शहर या मुख्य मार्गांवरून काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये पुसद शहर, वसंतनगर, पुसद ग्रामीण व खंडाळा पोलीस ठाण्यांतील एकूण १२ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार तसेच ३६ होमगार्ड सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
