जिल्हा प्रतिनिधी, लातूर
लातूर:- मागील तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. विलासराव देशमुख, दिलीपरावजी देशमुख आ अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशन पाणी फाऊंडेशन सह अनेक सामाजिक संस्था यांच्यासह विविध विविध सामाजिक उपक्रम राबून आमदार खासदारांचा निधी आणून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे रामेश्वरजी धूमाळ याना स्वप्नल फाउंडेशनच्या वतीने ११ वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीना दिला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर झाला असून दि.२३ मार्च रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे धुमाळ यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल स्वप्नल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भल्लाळ यांनी घेऊन खर्या अर्थाने धुमाळ यांच्या कार्याचा गौरव केला आहे रामेश्वरजी धुमाळ यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी सदरील अग्रलेख नक्की वाचा धुमाळ हे पाखरसांगवी येथील नवीन वसाहतीमध्ये राहत असून पाखरसांगवी हे गाव लातूर शहरालगत असून या गावामध्ये २५ वर्षामध्ये नवीन वसाहत झाली असून तेथे रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, गटार आदी मुलभूत सुविध नव्हत्या २००३ मध्ये पाखरसांगवी परिसरात वास्तव्यास गेले असता प्रचंड नागरी सुविधांची वाणवा होती. गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे शहरालगत पीण्याचे पाणी जात असलेल्या लिकीज वॉलमधून येथील नागरिक पिण्याच्या पाण्याची तहान भागवत होते. ह्या अडचणी सोडवण्यासाठी रामेश्वरजी धूमाळ यांनी रेल रोको, रस्ता रोको, घंटानाद आंदोलन, सत्याग्रह, उपोषण, करुन त्या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. एवढ्यावरच न थांबता आमदार, खासदार, मंत्री यांचा विकास निधी आणुन तसेच मुंबई येथील मंत्रालयामध्ये जावून कोट्यावधी रुपयांचा निधी रामेश्वरजी धूमाळ यांनी उपलब्ध करुन घेतला. याउपरही निधी कमी पडत असल्यामुळे, रस्ते निर्मितीसाठी लोकसहभागाची चळवळ उभी करुन गावकऱ्यांना आदर्श गाव हिवरेबाजारचे प्रणेते पोपटराव पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथे पाखरसांगवी येथील गावकऱ्यांना घेवून जावून ते गाव कसे विकसीत झाले त्याचे ज्वलंत उदाहरण गावकऱ्यांसमोर ठेवले आणि त्यातुन लोकसहभागाची चळवळ पाखरसांगवीमध्ये राबवून येथील गावकऱ्यांना लोकसहभागाची चळवळ पटवून दिली. त्या गावाप्रमाणेच आपल्या गावाचा विकास व्हावा या उद्देशाने २१ कि.मी. नाला सरळीकरण, खोलीकरण, सकाळ माध्यम समुह,दिलीपराव देशमुख अमित देशमुख यांच्या मदतीमधून गावाचा विकास करण्यासाठी रामेश्वरजी धूमाळ यांनी कोट्यावधींचा निधी आणला. गावकऱ्यांच्या हितासाठी त्यावेळेस जलयुक्त शिवर ची योजना राबवून शासनाचा खुप मोठा निधी गावासाठी आणला. त्यासोबतच लाईटचे पोल, डि.पी. आणण्यासाठी प्रयत्न केले. नवीन वसाहतीमध्ये रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी १५३ रस्ते लोकसहभागातून निर्माण केले. राशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्डचे शिबीर भरवून जनतेला हे सर्व कार्ड घरपोच मिळवून दिले. त्यासोबतच श्रावण बाळ योजना, निराधार, विधवा, परित्यक्ता योजना, अपंग योजना, विविध प्रकारची आरोग्य शिबीरं, रक्तदान शिबीरं तसेच अनेक प्रकारच्या शासनाच्या योजना रामेश्वरजी धूमाळ यांनी रामेश्वरजी धुमाळ युवा प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन पाखरसांगवी मधे लोकांना घरपोच सुविधा उपलब्ध करुन दिल्या.मागील ३० वर्षांपासून रामेश्वरजी धूमाळ हे सामाजिक उपक्रम सक्रिय पणे राबवत आहेत व धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून अहोरात्र कार्य करत आहेत. गावामध्ये विविध महापुरुषांचा सार्वजनिक जयंती उत्सव, धार्मिक उत्सव साजरा करण्यामध्ये त्यांची प्रामुख्याची भूमिका राहिली आहे. त्यासोबतच वृक्षारोपण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरोघरी शोषखड्ड्यांचे महत्तव गावकऱ्यांना पटवून दिले तसेच गावामध्ये व्याख्याने, शिबीरं, धार्मिक गुरुंचे मोठमोठे कार्यक्रम सातत्याने ते राबवितात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, इफ्तार पार्टी, दिवाळीचे फराळ आदी कार्यक्रम त्यांचे उल्लेखनिय असतात. ते समिक्षा या व्रत्तपत्राचे मागील २० वर्षापासून संपादक आहेत. या दैनिकाच्या माध्यमातुन आजपर्यंत रामेश्वरजी धूमाळ यांनी विविध क्षेत्रातील देशपातळीवर कार्य करत असलेल्या तसेच गावपातळीवरही आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. त्यांनी जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ऊस वाटप, रस वाटप, गुळ वाटप, जेलभरो आंदोलन करुनशेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनास भाग पाडले. रामेश्वरजी धूमाळ यांचा महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. रामेश्वरजी धूमाळ हे सर्वसामान्य कुटुंबातील असूनही स्वतःच्या घरावर तुळशीपत्रं ठेवून समाजाच्या हिताची कामे ते मागील ३० वर्षापासुन सातत्याने करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य करून शेकडो गावमध्ये काम केले असून यांच्या कार्यामुळे हजारो लोकांना प्रेरणा मिळाली असून लाखो लोकांना फायदा झाला आहे या कार्याची दखल घेऊन स्वनल फाउंडेशन पुणे यांच्या अध्यक्षा शोभाताई भल्लाळ घेऊन रामेश्वरजी धुमाळ याना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी धुमाळ यांचे स्वागत केले जात आहे

