लाखो भक्तांनी दिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप.
जगप्रसिद्ध दत्तशिखर संस्थानचे 30वे महंत कै प.पू.प.मधुसुदन भारती महाराज यांचे दिनांक 4एप्रिल 2026रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते त्यांचे वर दिनांक 5एप्रिल 2026रोजी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात दत्तशिखर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता. साश्रू नयनांनी निरोप दिला यावेळी भक्तांना अश्रु अनावर झाले होते.
प.पु.प.कै.महंत मधुसूदन भारती यांचा जन्म अहिल्या नगर येथे झाला असून त्यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दत्तशिखर संस्थान येथे आणुन सोडले होते.हिवरा ता.महागाव येथील शाळेत 10वीची परीक्षा झालेवर दिक्षा देण्याचे निश्चित झाले त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थांवर दत्त प्रभुंच्या सेवेत असताना प.पू .प.कै.महंत गुरू अच्युत भारती यांचे वारस म्हणून सन 1978सालीरथसप्तमीच्या दिवशी 30वे महंत म्हणून नियुक्ती झाली.त्यांचा 48 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून दिनांक 4एप्रिल 2026रोजी त्यांचे निधन झाले.
त्यानंतर दिनांक 5एप्रिल रोजी परंपरेनुसार त्यांचे वारस म्हणून ईश्वर चिठ्ठीने प.पू.प.योगी शामभारती महाराज यांची 31वे महंत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प.पू.प.कै.महंत गुरु मधुसुदन भारती यांचेवर शोकाकुल वातावरणात विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी प्रचंड जनसागर लोटला होता यावेळी लाखो भक्तांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
यावेळी माहुर करांनी आपले सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून प.पु.प.कै.महंत मधुसूदन भारती (मालक)यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माहूरवासियांतर्फे गडावर आलेल्या भक्तांसाठी दत्तनगर (टिपॉईंट) येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच माहुर आगारातर्फे भाविकांना दत्तशिखरावर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
