*आयोजक भीम टायगर सेना सामाजिक संघटना पुसद*
*पुसद प्रतिनिधी*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त भीम टायगर सामाजिक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक मान्यवर तथा पत्रकार बांधवांचा निळे फेटे बांधून सत्कार.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भीम टायगर सेना सामाजिक संघटना आयोजक यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी पुसद शहरातील उत्सव मंडळातील मंडळ विविध देखावे सादर करणारे व सहभागी अध्यक्ष तथा सदस्य अतिशय चांगल्या प्रकारचे देखावे सादर करतात त्या सर्व अध्यक्षांचा मिरवणूक देखावे विसर्जन झाल्यानंतर व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर तथा पत्रकार बांधवांचा *निळ्या क्रांतीचे निळे फेटे* बांधून किशोर दादा कांबळे यांच्या व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिवसेंदिवस निळे फेटे बांधण्याच्या संख्येमध्ये वाढ होत असून जवळपास 250 ते 300 च्या वर समाजबांधव अतिथी अध्यक्ष व पत्रकार यांना फेटे बांधण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्मभूषण पुरस्कार प्राप्त भीमराव दादा कांबळे, पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे तसेच प्रमुख पाहुणे परमेश्वर जयस्वाल, समाज भूषण पुरस्कार प्राप्त ॲड. विश्वास भवरे, धम्मक्रांती प्रज्ञापर्व जयंती उत्सव समिती 2026 चे अध्यक्ष प्रा. डॉ सुनील खाडे, किशोर मुजमुले, गोविंदराव कांबळे,महेश खडसे, सोनू वरठी, मिलिंद जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे,गीता ताई कांबळे, वर्षा कांबळे, विशाखा कांबळे, नाना बेले, महेश निखाते,बाळासाहेब कांबळे, विनोद दोडके, पत्रकार राजेश ढोले, राजेश सोनुने , मारोती भस्मे, कैलास श्रावने,विजय निखाते, समाधान केवटे,शब्बीर शेख, मुबशीर शेख, बाळा टाकरस, पवन चव्हाण, बाबा खान, बाबुभाई शेख, समाधान केवटे, प्रमोद धुळे, गजानन हिंगमिरे इत्यादी सह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन प्रा. जनार्दन गजभिये, आणि नारायण ठोके यांनी केले व आभार राजेश ढोले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पथक परिश्रम घेतले.
