दिनांक 28 जून 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व संत कबीर यांची संयुक्त जयंती दिग्रस येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृह दिग्रस येथे पुरोगामी समतावादी विचार मंच, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ तथा बामसेफ च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती व संत शिरोमणी कबीरदास यांची संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाची अध्यक्षता मा. दिलीप जवादे सर, प्रमुख मार्गदर्शकामध्ये मा. विनोद निकोसे सर, प्रदीप चोपडे सर, चैतन्य गायकी मॅडम, प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका कुसुमताई जांगडे मॅडम उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम सोळंके सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कांबळे मॅडम, कार्यक्रमाचा आभार चैतन्य गायकी मॅडम यांनी केले.या प्रसंगी मार्गदर्शन करताना समाजामध्ये हजारो वर्षापासून व्यवस्थेने सगुण आणि निर्गुण असे दोन विचार प्रवाह निर्माण केले. ज्यामध्ये सगुण प्रवाहामध्ये संत तुलसीदास ,मिराबाई
या सगुण प्रवाहाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिकता आणि विषमतेला खतपाणी घालण्याचे कार्य समाजात केले. आणि निर्गुण प्रवाहामध्ये संत कबीर ,संत रोहिदास ,संत तुकाराम , संत सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, आणि इतर संत, समाज सुधारक हे समतेला मानणारा प्रवाह समाजामध्ये सत्य सांगण्याचे काम या प्रवाहाच्या माध्यमातून केले. तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये बहुजन समाजाला 50 टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे केले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था केली , अनिष्ट चालीरीतीवर प्रहार केला. जातिव्यवस्था निर्मूलनाचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. धार्मिक कर्मकांड ब्राह्मणाकडून करण्यात येऊ नये असे आपल्या संस्थानांमध्ये फरमाण काढले.जातिभेद नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी दलित समाजातील कांबळे नावाच्या व्यक्तीला चहाचे हॉटेल टाकून दिले आणि तिथे ते रोज स्वतः आपल्या सहकार्यासह चहापाणी घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचे. अशा पद्धतीने जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी महाराजांनी कार्य केले. शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बहुजन समाजाचे नेतृत्व समाजाला मान्य करण्यासाठी भाग पाडले. तसेच संत कबीर यांनी समाजामध्ये चाललेल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर आपल्या दोह्यांच्या, झोपायच्या माध्यमातून जसे. जाती न पूछो साधु की ,पुछ लिजिए ज्ञान. मोल करो तलवार का, बडा रहने दो म्यान. ..ऐसा मैं चाहू राज जहा मिलै सबन को अन्न,भुखा नही रहे कोय, तब रहदास रहे प्रसन्न,अनिष्ट रूढी परंपरेवर,विषमतेवर, अंधश्रद्धेवर, दैववादावर, घनाघात करण्याचे कार्य संत कबीर यांनी केली. जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला बुद्धिमत्ता खाडे सर प्राध्यापक विपिन मनवर सर, डीडी मनवर सर, इंजिनीयर निरपासी साहेब, विकास गावंडे, शुभम.श चक्रनारायण, इंगोले साहेब, माया गायकी मॅडम, मस्के मॅडम, लक्ष्मीबाई ठाकरे, घुले मॅडम ,लिलाबाई रंगारी मॅडम,वैशाली कांबळे मॅडम, प्रदीप चोपडे, चैतन्य गायकी मॅडम, इत्यादी महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
